पीएफआयवरील छापे; हिंदुत्ववादी सरकारचा देशभरात इस्लामी कट्टरतावाद्यांविरुद्ध “The first ever strategic salvo”!!


विशेष प्रतिनिधी 

देशभरात घातपाती कारवायांना टेरर फंडिंगचे पाठबळ देऊन करून धार्मिक आधारावर फूट पाडणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर गेल्या काही दिवसातले छापे ही वरवरची घटना नाही, तर केंद्रातल्या हिंदुत्ववादी सरकारने देशविघातक इस्लामी कट्टरतावादी देशभरात सोडलेला हा the first ever strategic salvo आहे.NIA raids on PFI – SDPI : the first ever strategic salvo on Islamic fundamentalists by right wing hindu central government of India

या विधानाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. यातला प्रत्यक्ष शब्द महत्त्वाचा आहे. “हिंदुत्ववादी सरकार”, first ever आणि strategic salvo या तीनही संकल्पनांना विशिष्ट अर्थ आहेत. बहुमत नसणे; बहुमत असणे फरक

देशात आत्तापर्यंत अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी पंतप्रधान झाले. पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारची मर्यादा त्यांच्या बहुमत नसण्यात होती. त्यामुळे इस्लामी कट्टरतावादी देशविघातक शक्तींवर कारवाया करण्यामध्ये मर्यादा पडल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या बाबतीत बहुमत नसण्याचा अयब म्हणजे उणीव दोनदा दूर झाली. पण मोदी सरकार आल्याबरोबर हिंदुत्ववादी सरकारच्या थेट कारवाया दिसल्या नाहीत. पण “तसे” काम सुरू झाल्याचे मात्र नक्की होते. त्याचे परिणाम काही वर्षांनंतर दिसले.

तीन तलाक ते एअर स्टाईल

तीन तलाक विरुद्ध कायदा, 370 कलम हटवणे, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करणे या गोष्टी हिंदुत्ववादी सरकारची उत्तम कामगिरी जरूर म्हणता येईल. किंबहुना हिंदुत्ववादी सरकार नसते तर या गोष्टी घडल्याही नसत्या हेही मान्य करावे लागेल. पण तरीही त्यांना इस्लामी कट्टरतावादी देश विघातक शक्तींविरुद्ध the first ever strategic salvo म्हणता येणार नाही. कारण वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा टार्गेट ऑडियन्स विशिष्ट होता. तीन तलाक हा विषय मुस्लिम महिलांच्या पीडेशी संबंधित होता. 370 कलम देशाच्या हृदयात घुसलेला काटा होता हे खरे, पण तो प्रामुख्याने जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित विषय होता. पाकिस्तान वरचे सर्जिकल आणि एअर स्ट्राइक हे आपल्या आक्रमक संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे दृश्यमान स्वरूप होते.

 पीएफआय वरील कारवाईची व्यापकता

पण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया SDPI अशी मायावी नावे धारण करणाऱ्या इस्लामी कट्टरतावादी संघटनांविरुद्ध देशातील 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे आणि कायदेशीर कारवाई याची व्यापकता लक्षात घेतली, तर त्यामागचे खरे इंगित लक्षात येईल. किंबहुना संपूर्ण देश सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या पोखरणारे सर्वात मोठे Terror Module समूळ खणून काढण्याचाच हा प्रकार आहे!!, असे म्हणता येईल.

 जबरदस्त को-ऑर्डिनेशन

पीएफआय आणि एसडीपीआय या दोन्ही संघटनांची modus operandi लक्षात घेतली तर ही बाब अधिक स्पष्ट होईल. देशभर पसरलेल्या घरे, मशिदी, मदरशांशी संबंधित विशिष्ट लाखो बँक खात्यांमध्ये निवडक अरब देशांमधून हजारो कोटींची रक्कम एकाच वेळी जमा होणे, तिचे गुप्तचर खात्यांनी ट्रॅकिंग करणे, कोठेही इन्फॉर्मेशन लिक होऊ न देणे, 15 राज्यांमधल्या पोलिस यंत्रणांशी केंद्रीय तपास यंत्रणांचे बिन बोभाट को-ऑर्डिनेशन होणे, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या!! त्या घडल्या आहेत!! आणि भविष्यातही घडत राहणार आहेत… ही बाब सर्वाधिक महत्त्वाची आहे.

बुद्धिबळातल्या सर्वोत्तम हालचाली

या कारवाई मध्ये सहभागी झालेले सगळे “राजे”, “वजीर”, “उंट”, “हत्ती” “घोडे”, “प्यादे” आदी सगळे व्यवस्थित हलवले गेले आहेत. बुद्धिबळाच्या पटावर कोणतीही कमतरता ठेवली गेली नाही. देशाच्या एका विशिष्ट कोपऱ्यात झालेली ही कारवाई नाही, तर संपूर्ण देशभरात विविध राजकीय पक्षांची राजवट असणाऱ्या राज्यांमध्ये पीएफआय आणि एसडीपीआय ची टेरर मॉड्युल खणून काढण्याची ही कारवाई आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे किंबहुना याच अर्थाने हिंदुत्ववादी सरकारचा इस्लामी कट्टरतावादी देश विघातक शक्तींविरुद्द हा “द फर्स्ट एव्हर स्ट्रॅटेजिक सॉल्वो” आहे!!

 परसेप्शन खोडून काढले

आत्तापर्यंत हिंदुत्ववादी सरकार म्हणजे फक्त भावनिक मुद्द्यांच्या आधारावर अर्थात इमोशनल पॉलिटिकल परसेप्शनवर चालणारे सरकार असा समज होता. तो मोदी सरकारने प्रत्यक्ष कृतीतून खोडून काढला आहे. पीएफआय – एसडीपीआय वरील छापे हे त्याचे ठळक निदर्शक आहेत.

माध्यमांचे उथळ रिपोर्टिंग

पण या छाप्यांचे मेन स्ट्रीम माध्यमांमधले रिपोर्टिंग तुलनेने फारच उथळ आहे. त्यात फारसे खोलात कुणी गेलेले नाही किंबहुना अंगभूत बुद्धी मर्यादेमुळे जाऊ शकलेले नाही. या रिपोर्टिंगची भाषा पण “पीएफआय वरच्या छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे”, “स्फोटक माहिती बाहेर” वगैरे भाषेच्या पलिकडे नाही. पण पीएफआय आणि एसडीपीआयचे घरांपासून, मशिदी, मदरशांपर्यंत पोहोचलेले Terror Module खणून काढण्याच्या बातम्या माध्यमांच्या आकलना बाहेरच्या आणि त्यामुळेच रिपोर्टिंगच्याही बाहेरच्या आहेत!!… त्या समजून घेण्यासाठी खरंच खूप अभ्यास केला पाहिजे… माध्यमे तो करतील??

NIA raids on PFI – SDPI : the first ever strategic salvo on Islamic fundamentalists by right wing hindu central government of India

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय