केरळ पोलीसांचे तब्बल 873 अधिकारी, कर्मचारी PFI चे हस्तक; NIA चा धक्कादायक खुलासा!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण भारतात दहशतवादी कारवाया फैलावण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी तिच्या कारवाया किती भयानक होत्या आणि तिची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचे अनेक धक्कादाय खुलासे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए ने केले आहेत.  As many as 873 officers of Kerala Police

यापैकी सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे पीएफआय संघटनेने केरळ पोलीस खात्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शिरकाव करून तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फोडले होते, तसेच त्यांच्या करवी ते अनेक गुपिते फोडून घेत होते आणि आपल्या कारवाया आखत होते. केरळ पोलिसांमधले सर्वसामान्य कर्मचारी ते अतिवरिष्ठ अधिकारी असे तब्बल 873 अधिकारी कर्मचारी पीएफआय साठी हस्तक बनून काम करत होते, असा धक्कादायक खुलासा एनआयए ने केला आहे.

केरळचे हे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पीएफआय संघटनेच्या म्होरक्यांना विविध पॉलिसी गुपिते फोडून सांगत होते. तसेच कोठे छापे पडणार?, ते केव्हा पडणार?, त्यासाठी पोलीस संख्या किती असणार?, आदी माहितीचे तपशीलही देत होते. त्यामुळे पीएफआय संघटनेच्या म्होरक्यांना आपल्या विविध दहशतवादी कारवाया “मॅनेज” करता येत होत्या. केरळ पोलिसांचा हा भयानक चेहरा राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनएच पुढे आणल्याने त्याविषयी शंकेला वाव नाही.

पीएफआय संघटनेच्या विविध कारवायांचा सखोल तपास करताना यापेक्षाही अधिक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

As many as 873 officers of Kerala Police

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात