दसरा मेळावात गर्दीसाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून 4 बस; शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंचे टार्गेट!!


प्रतिनिधी

मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन्ही गट शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट आखून दिल्याची माहिती आहे. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक शाखेतून ४ बस सोडण्यात येणार असून, त्यातून एकट्या मुंबईतून यंदा ५० हजारांपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.4 buses from each branch in Mumbai for Dussehra Melaav crowd; Uddhav Thackeray’s target for branch chief!!

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी शिवसेना भवनमध्ये उद्धव गटाची बैठक झाली. यावेळी शिवाजी पार्कमधील तयारी आणि इतर विषयांवर चर्चा झाली. शिवाय गर्दी जमवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी जवळपास 10000 हून अधिक बस आरक्षित केल्याने, त्यांची मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीस गर्दी जमवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून ४ बस सोडल्या जाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.



मुंबईत शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत. यातून प्रत्येकी ४ बस सोडल्यास ९०८ गाड्या भरून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होतील. एकट्या मुंबईतून यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर विभाग प्रमुखांची बैठक घेत केल्याचे कळते.

 राजन विचारेंवर जबाबदारी

मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहे. दसरा मेळाव्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्याशिवाय ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यासह, मीरा-भाईंदर व नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

4 buses from each branch in Mumbai for Dussehra Melaav crowd; Uddhav Thackeray’s target for branch chief!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात