कॅनडात भगवद् गीता पार्कमध्ये तोडफोड : भारताने केला निषेध, हेटक्राइमच्या चौकशीचे आदेश


वृत्तसं‌स्था

टोरंटो : कॅनडातील भगवद्गीता पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याला ‘हेट क्राइम’ म्हटले आहे. यासोबतच भारतीय उच्चायुक्तांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले की, “आम्ही ब्रॅम्प्टनमधील श्री भगवद गीता पार्कमधील द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या घटनेचा निषेध करतो आणि कॅनेडियन अधिकारी आणि पोलिसांना तपास करून दोषींवर त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन करतो.” Bhagwad Gita Park Vandalism in Canada India Protests, Hate Crime Inquiry Ordered

यापूर्वी रविवारी श्रीभगवद गीता पार्कमध्ये तोडफोड झाल्याची घटना घडली होती. भागवत गीता पार्कच्या प्रतिकांची तोडफोड करण्यात आली. महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी याला दुजोरा दिला. या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की, पार्कच्या प्रतिकांची तोडफोड करण्यात आली आहे. यासाठी आमचे झीरो टॉलरन्स धोरण आहे. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या उद्यानाचे नुकतेच महापौर ब्राऊन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ‘श्री भगवद्गीता पार्कची प्रतिके पाडण्यात आली आहेत. या उद्यानाचे आम्ही नुकतेच लोकार्पण केले होते. यासाठी आमची झीरो टॉलरन्स पॉलिसी आहे. याबाबत आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 3.75 एकरमध्ये पसरलेल्या या उद्यानात रथांवर भगवान कृष्ण आणि अर्जुन आणि इतर काही हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे. हरियाणा सरकारने सांगितले की, भारताबाहेर कदाचित हे एकमेव उद्यान आहे, ज्याला भगवद्गीतेचे नाव देण्यात आले आहे.

Bhagwad Gita Park Vandalism in Canada India Protests, Hate Crime Inquiry Ordered

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय