बेरोजगारी, आर्थिक विषमतेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केली चिंता; सरकार्यवाह म्हणाले- गरिबीच्या राक्षसाचा वध करणे गरजेचे


प्रतिनिधी

नागपूर : देशातील बेरोजगारी आणि उत्पन्नातील वाढत्या विषमतेबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी चिंता व्यक्त केली. गरिबी आमच्या समोर एखाद्या राक्षसासारखी आव्हान बनून उभी ठाकली आहे, असे ते म्हणाले. स्वदेशी जागरण मंचाच्या एका वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. Rashtriya Swayamsevak Sangh expresses concern over unemployment, economic disparity Need to slay demon of poverty – Sarkaryavah Hosbale

गरिबी, आर्थिक विषमतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही पावले उचलली गेली आहेत तरी अद्यापही २० कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत ही खेदाची बाब आहे. ३० कोटी लोकांचे दररोजचे उत्पन्न ३७५ रुपयांपेक्षाही कमी आहे. गरिबी आणि बेरोजगारी या दोन आव्हानांचा खात्मा करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.बेरोजगारीच्या मुद्द्याला अधिक स्पष्टपणे अधोरेखित करताना ते म्हणाले, एका सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर ७.६ टक्के आहे. रोजगारवृद्धीसाठी केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर स्थानिक पातळीवरील योजनांवर भर देण्याची गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या सहा क्रमांकांमध्ये असूनही देशाच्या अर्ध्याअधिक लोकसंख्येकडे एकूण उत्पन्नाचा केवळ 13% वाटा असल्याचे ते म्हणाले.

Rashtriya Swayamsevak Sangh expresses concern over unemployment, economic disparity Need to slay demon of poverty – Sarkaryavah Hosbale

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय