ABP C Voter सर्वेक्षण : सावध ऐका पुढल्या हाका…, पण काँग्रेससाठी


विशेष प्रतिनिधी

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर होणे अपेक्षित आहे. त्याआधी एबीपी – सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात जे काही निष्कर्ष आले आहेत, त्यामधून भाजप जिंकणार ही बातमी आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बातमी काँग्रेससाठी आहे आणि तीच नेमकी, “सावध ऐका पुढल्या हाका”, अशी आहे!! ABP c voter survey : Congress lagging behind and regional parties surging ahead to fight BJP

कारण काँग्रेसला भाजपपासून धोका असणे स्वाभाविक आहे… पण त्या पलिकडचा धोका मतदानाच्या टक्केवारीतून संभवतो आहे, तो आम आदमी पार्टीचा आहे!!

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये मिळून तब्बल 65 हजार 621 मतदारांनी सर्वेक्षणात भाग घेतला आहे. याचा अर्थ सॅम्पल साइज मोठा आहे आणि त्यामुळेच सर्वेक्षणातील निष्कर्षाकडे काँग्रेस सारख्या पक्षाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

सर्वेक्षणाचा निष्कर्ष आणि अर्थ

गुजरात मध्ये भाजपला 63% मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रेसला फक्त 9 % मतदारांचा कौल आहे, तर आम आदमी पार्टीला तब्बल 19 % मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे, ती नेमकी इथेच!! अशीच काहीशी बाब हिमाचल प्रदेशासाठी आहे. हिमाचल प्रदेशात भाजपला 45 % मतदारांनी कौल दिला आहे. काँग्रेसला 36 % मतदारांनी कौल दिला आहे, तर आम आदमी पार्टीला 8 % मतदारांचा कौल आहे. याचा अर्थ काँग्रेस हिमाचल प्रदेशात भाजपवर मात देण्याच्या स्थितीत असताना आम आदमी पार्टीला 8 % मतदारांचा कौल मिळणे, याचा काँग्रेस नेत्यांनी अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे.


Congress : जनतेशी संपर्क तुटल्याची कबुली देत राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर!!


गुजरातच्या बाबतीत तर सरळ सरळ आम आदमी पार्टी विधानसभेत विरोधी पक्षाचे प्रमुख स्थान मिळवणार हे टक्केवारीतूनच दिसून येत आहे. काँग्रेसला 9 % आणि आम आदमी पार्टीला 19 % यामध्ये तब्बल 10 % चा फरक आहे. याचा अर्थ आम आदमी पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून येतील, त्यापेक्षा दुप्पट उमेदवार काँग्रेसचे पडतील, असा काढल्यास फारसे गैर ठरणार नाही.

2017 मध्ये काँग्रेस मजबूत, पण…

2017 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल नीट पाहिले, तर भाजपला 100 च्या आत म्हणजे 99 जागांवर रोखण्याची हिमाकत काँग्रेसने दाखविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारख्या कसलेल्या प्रचाराच्या तोफा असताना त्यांच्याच गृहराज्यात काँग्रेसने 87 जागांची मजल मारली होती. काँग्रेसचे हे मोठे राजकीय कर्तृत्व होते यात शंका नाही. पण आता साबरमतीतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे. भाजपने तिथली सामाजिक आणि राजकीय वीण घट्ट केली आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा गुजरात मधला राजकीय शिरकाव यशस्वी झाल्याचे आकडेवारी सांगते आहे. अन्यथा आम आदमी पार्टीला 19 % मते कुठून मिळणार??… पण मग काँग्रेसला 2017 चे यश टिकवून ते वाढविण्याची क्षमता का दाखवता आले नाही??, हा प्रश्न निदान सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून तरी पडल्याशिवाय राहत नाही.

सुरत महापालिकेतील झलक

याची थोडीफार झलक सुरत महापालिकेच्या निवडणुकीत दिसली होती. सुरत मध्ये भाजपने महापालिका जिंकली होती, हे खरे. पण काँग्रेसने नव्हे, तर आम आदमी पार्टीने सुरत महापालिकेत विरोधी पक्षाचे स्थान मिळवले होते. हा इतिहास फारसा जुना नाही तो 2017 नंतरच्याच पंचवार्षिक निवडणुकीतला आहे.

काँग्रेसच्या यशात प्रादेशिक अडथळे

त्याचा दुसरा अर्थ असा तो म्हणजे काँग्रेस जेव्हा हिरीरीने भाजपची टक्कर घ्यायला पुढे असेल सरकेल तेव्हा काँग्रेस पुढे खरा अडथळा आम आदमी पार्टी सारख्या प्रादेशिक पक्षाचाच असेल. पंजाब मध्ये याचा प्रत्यय आला आहे. प्रादेशिक पक्ष या दृष्टीने दक्षिणेतल्या तामिळनाडू तेलंगण आंध्र या राज्यांमध्ये तो प्रत्येक नियमित येतो आहे. गुजरात मध्ये आम आदमी पार्टी पुढे सरकणे आणि हिमाचल मध्ये काँग्रेसचे यश कमी करणे ही खऱ्या अर्थाने भाजप पेक्षा काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे… म्हणूनच एबीपी सी व्होटरचे सर्वेक्षण “सावध ऐका पुढल्या हाका”, असे काँग्रेसला सांगते आहे!!

ABP c voter survey : Congress lagging behind and regional parties surging ahead to fight BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात