संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!


वृत्तसंस्था

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी झाल्या.
संतोष यादव यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या समवेत प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे पूजन केले.For the first time in Sangh’s Vijayadashami event, Everest Veerangana Santosh Yadav is the first female Chief Guest!!



द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्या संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या पूर्ण गणवेशात स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना संघाच्या कार्यक्रमात प्रथमच एका कर्तृत्ववान महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.

या कार्यक्रमाची ही क्षणचित्रे :

 

 

 

 

 

 

For the first time in Sangh’s Vijayadashami event, Everest Veerangana Santosh Yadav is the first female Chief Guest!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात