CJP च्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांचा कायदेशीर कारवाईचा बडगा; ५ FIR दाखल; आरोपींची ओळख पटली!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात दगडफेक करून हिंसाचार माजवून दहशत निर्माण करणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कनॉट प्लेस, पार्लमेंट स्ट्रीट आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये ५ एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. आणखी एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे, असे दिल्ली पोलिसांनी आज स्पष्ट सांगितले.

  • CJP च्या निषेध मोर्चात हिंसाचार

संसदेचे अधिवेशन सुरू असताना नवी दिल्ली जिल्हा परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी एक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणीही एक एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासादरम्यान यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.



  • अशी लावली कलमे

सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे या प्रकरणांमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’, ‘शस्त्र कायदा (Arms Act) १९५९’ आणि ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा (PDPP Act)’ यांच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम २२३(b) BNS – लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन किंवा सरकारी कामात अडथळा आणणे. एफआयआरमधील आरोपानुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे एकत्र येऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत व्यत्यय आणला, सरकारी कामात अडथळा निर्माण केला, हिंसक कृत्ये केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या सर्व आरोपांची चौकशी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामार्फत ‘भारतीय न्याय संहिता’, ‘शस्त्र कायदा’ आणि ‘PDPP कायदा’ यांच्या तरतुदींनुसार केली जात आहे.

 

Violence during CJP protest march

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात