किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक


प्रतिनिधी

मुंबई : राणा दाम्पत्य यांना मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्यापासून प्रतिबंध करण्याकरता शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर राडा केला. पोलिसांनी अखेर राणा दाम्पत्य यांना अटक केली. त्यांना जेव्हा खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेव्हा तिथे भाजपचे नेते किरीट सोमय्या भेटायला गेले, त्यावेळी सोमय्या यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. तसेच हाजी आलम, शेखर वायंगणकर आणि दिनेश कबुल यांनाही ताब्यात घेण्यात आले.Shiv Sena’s attack on Kirit Somaiya Former Mayor Vishwanath Mahadeshwar arrested

जेव्हा किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याना भेटायला गेले, त्यावेळी तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जेव्हा सोमय्या तेथून निघून जायला निघाले, तेव्हा मात्र शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, तसेच बाटल्या फेकल्या, त्यावेळी सोमय्या यांच्या गालावरून रक्त वाहताना दिसत होते. मात्र याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. सोमय्या यांच्या गालावर वाहणारे रक्त खरेच होते का?, याची पोलीस चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहेया हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्या दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटून हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही तासांतच माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेनेची जबाबदारी स्पष्ट झाली आहे की आणखी काही हे आई काळानंतर समजू शकेल.

Shiv Sena’s attack on Kirit Somaiya Former Mayor Vishwanath Mahadeshwar arrested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात