ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करणार, पण दिवाळीनंतर आणि नेतृत्व पडळकरांचे!!


प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, म्हणून राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानावर गेले 5 महिने आंदोलनावर ठाम होते. न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. यानंतर राज्यात विविध आगारात एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन निवळत असताना दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.ST Strike: ST workers will agitate again, but after Diwali and the leadership of Padalkar



नेतृत्व पडळकरांकडे

या आंदोलनापूर्वी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या एक प्रमुख मागणीसह राज्यातील संपूर्ण आगारात आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जाणार आहे. एसटी लढा विलीनीकरणाचा महाराष्ट्र राज्याचे सदस्य सतीश मेटकरी यांनी विलीनीकरणासाठी राज्यातील प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.

११५ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

विलिनीकरणाची मागणी आणि आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती न दाखविल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर दगडफेक, चप्पलफेक केली. केलेल्या यात सामील असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.

दरम्यान, जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडूनही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडूनही अहवाल मागवण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

ST Strike: ST workers will agitate again, but after Diwali and the leadership of Padalkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात