दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी


घरात वृद्ध पतीपत्नी दोघेच आहेत ही संधी साधून पाच दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – घरात वृद्ध पतीपत्नी दोघेच आहेत ही संधी साधून पाच दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर  जखमी झाल्या आहेत.  Robbery in urali kanchan area, one senior women injured in robber attack

याप्रकरणी बेबी महादेव कांचन (वय ५५, पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाच अज्ञात चोरट्यांविरोधात   दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन यांच्या सुनबाई तिचे माहेरी वनपुरी, ता. पुरंदर येथे गेलेली होती



तर २४ एप्रिल रोजी मुलगा संध्याकाळचे जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला असल्याने बेबी कांचन व पती हे दोघे घरात होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस दोघांनी जेवण केले. त्यानंतर घराला आतुन कडी लावुन ते टीव्ही पाहत होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारांस अचानक त्यांचेसमोर दोन चोरटे येउन उभे राहीले. त्यांनी चाकु काढुन बेबी यांना गळ्यातले कानातले सोने काढुन दे, नाहीतर जीव घेईन.

अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन त्यांनी गळ्यातील मंगळसुत्र काढुन दिले. त्यावेळी कानातील सोन्याच्या कुडक्या पण काढुन दे असे म्हणुन चाकु उगारला असता. बेबी यांनी कानातील कुडक्याही काढुन दिल्या, तरी त्याने चाकु त्यांचेकडे रोखून धरला. बेबी यांनी हिम्मत करून चोरट्याच्या हातातील चाकु  दोन्ही हातांनी पकडुन थोपविण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांचे दोन्ही हाताचे बोटांना चाकु कापलेने  गंभीर दुखापत झाली त्यामधुन रक्त येउ लागले.

त्यांनी आरडाओरडा केला, त्यावेळी समोरच्या खोलीकडे पाहीले तर पति महादेव तुकाराम ( बळी ) कांचन यांच्या समोर दोनजण चाकुचा धाक दाखवुन  घरातील कपाटाच्या किल्ल्यांची मागणी करीत होते. त्यावेळ बाहेर घराचे खिडकीजवळ आणखी एक माणुस उभा होता. त्यावेळी बाहेरच्या माणसाने चला रे म्हणल्याने घरातील चौघे चोरटे घराबाहेर निघुन गेले.

जखमी बेबी यांना उपचारासाठी ऊरूळी कांचन येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्या दोन्ही हाताला पंधरा टाके पडले आहेत. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता त्यांना दरोडेखोरांनी स्वयंपाकघराचे खिडकीतून हात घालून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. तेव्हा बाहेर पडलेल्या काठीच्या सहाय्याने दरवाज्याची कडी उघडली व घरामध्ये प्रवेश केला व दरोडा टाकून निघून गेले आहेत. परिसरातील अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे.

Robbery in urali kanchan area, one senior women injured in robber attack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात