संभाजी भिडे म्हणतात, औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश व गावात असलेल्या मुसलमानांच्या रूपाने शिल्लक


विशेष प्रतिनिधी

शिरूर : ज्या इस्लामच्या पोटतिडकीने औरंगजेबाने संभाजी महाराजांचे बलिदान केले, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू असून, संभाजी महाराज आज नाहीत, औरंगजेबही नाही, पण औरंगजेब आजही पाकिस्तानच्या, बागलादेशाच्या गावात असलेल्या मुसलमानाच्या रूपाने शिल्लक आहे, असे मत संभाजी भिडे यांनी केले.Sambhaji Bhide says that Aurangzeb still survives in the form of Muslims in Pakistan, Bangladesh and villages.

निर्वी (ता. शिरूर) येथे संभाजी भिडे मांडवगण फराटा येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, संभाजी महाराजांचे बलिदान आपण पाळत असलो, तरी त्याच्यात हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेले आहे.औरंगजेब आणि संभाजी महाराज ही दोन माणसं होती आणि त्यांच्यात वैर होते म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करून मारले. नाही तर त्याच्या अंत:करणातील इच्छा जी होती ती वेगळी होती. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या या देशाचे तुकडे तुकडे करून हिंदू, हिंदू धर्म, हिंदुस्थान आणि हिंदू समाज संपून टाकावा,

ही त्याच्या पोटातील आग, चीड आणि दुष्ट भावना होती. आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेब नाही. आता नवीन युग आहे. नवीन जगाबरोबर आपण चालू, मागचं झाले गेले विसरून जाऊया, अशी म्हणणारी नादान, नालायक वृत्ती सुशिक्षित लोकांत मोठ्या प्रमाणात आहे.

औरंगजेब आजही पाकिस्तानच्या रूपाने, बांगलादेशच्या रूपाने, गावात असलेल्या मुसलमानाच्या रूपाने शिल्लक आहे. संभाजी महाराजांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाबद्दलचा व धर्माबद्दलचा अभिमान न सोडता, न चुकता, न शरण जाता त्यांनी देशाचा व धमार्चा अभिमान अंत:करणात धरून मरण पत्करले; परंतु इस्लाम पत्करला नाही.

इस्लामला पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांच्या स्मरणातून त्यांना श्रद्धांजली वाहून आपण मिळवली पाहिजे आणि ती मिळते. संभाजी महाराजांना श्रध्दांजली वाहणे ही स्वातंत्र्याची, धमार्ची आणि मातृभूमीची उपासना आहे.

अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी ही गोष्ट आहे. एक दिवस असा उजाडावा की, या झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्थान उभा राहावा, ही अंत:करणात भावना जुळवून आपण वाटचाल करावी, असे संभाजी भिडे म्हणाले.

Sambhaji Bhide says that Aurangzeb still survives in the form of Muslims in Pakistan, Bangladesh and villages.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात