खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार बरखास्त करा; राज्यपालांना संभाजी भिडे यांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

सांगली : खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बरखास्त करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. Dismiss Thackeray-Pawar government for decision to sell liquor openly; Sambhaji Bhide’s appeal to the Governor

आर. आर.पाटील यांनी डान्स बार बंद केले. आज आबा असते, तर दारू विक्रीचा घातकी आणि नीच निर्णय मंत्रिमंडळात झाला नसता. त्यामुळे आबांची आठवण येत आहे, असे ही संभाजी भिडे यांनी सांगितले. लिव्ह आणि रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना पण संपवलं पाहिजेल, असे सांगून भिडे पुढे म्हणाले, मुंबईत नाईट लाईफचा निर्णय घेऊ म्हणणे म्हणजे समाज व्याभिचाराच्या दिशेने जाण्यासारखा आहे. खुलेआम दारू विक्रीचा निर्णय मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे.



सर्वात चांगले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. लालबहादूर शास्त्री सारखा मोदींचा कारभार आहे, मोदींनी देशात दारू बंदी करावी, अस मत त्यांनी व्यक्त केले.राष्ट्राला राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी विचारच अधिष्ठान असावं लागतं. मात्र, दारू खुलेआम विकण्याचा राज्यसरकारचा निर्णय, हा हानिकारक, संताप आणणारा आहे, असे सांगून भिडे पुढे म्हणाले, हिंदुत्ववादी संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा अशा संघटनांनी दारू विक्री निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर आले पाहिजे. दारूच्या निर्णया विरोधात एकही मंत्र्याने आवाज उठविला नाही, याचे मला आश्चर्य वाटत असून हे सरकार राज्यपालांनी बरखास्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Dismiss Thackeray-Pawar government for decision to sell liquor openly; Sambhaji Bhide’s appeal to the Governor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात