इजरायल मध्ये उभे राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक; महाराष्ट्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन!!

Chhatrapati Shivaji Maharaj

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आणि पूजन आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नसून ते जगभरात पोहोचले आहे. याचे प्रत्यंतर आज एका महत्वपूर्ण घोषणेमुळे आले. भारत सोडून आता अन्य एका देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणार आहे, तो देश म्हणजे इजरायल असणार आहे.Statue and memorial of Chhatrapati Shivaji Maharaj to be erected in Israel; Maharashtra government’s support and guidance!!

भारताचे इजरायल मधले राजदूत यानिव रेवाच यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना रेवाची यांनी इजरायल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा आणि स्मारक उभारायची इच्छा व्यक्त केली त्यावेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मागितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब इजरायलच्या राजदूतांची इच्छा पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी इजराइलच्या राजदूतांना दिला.



या संदर्भात इजरायली राजदूतांनी ट्विट केले. ते असे :

शिवराज्याभिषेक दिनी मी अभिमानाने सांगू इच्छितो की, आम्ही इस्रायमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करणार आहोत. हे स्मारक महाराजांच्या कार्याला साजेसे होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे सहकार्य मागितले आणि त्यांनी ते तात्काळ देऊ केले.
जय भवानी जय शिवाजी!!

देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट करून आनंद व्यक्त केला.

– देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट असे :

अभिमानास्पद व ऐतिहासिक!!

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इस्रायल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केल्याबद्दल इस्रायलचे महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांचे मनापासून आभार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे संपूर्ण सहकार्य करेल.
जय भवानी, जय शिवाजी!!

Statue and memorial of Chhatrapati Shivaji Maharaj to be erected in Israel; Maharashtra government’s support and guidance!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात