पी. चिदंबरम यांचा प्रियंका गांधींवर निशाणा, पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणुका एकाच वेळी लढवू नका असे सांगूनही ऐकले नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात निवडणूक लढविणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे ही दोन्ही कामे एकाचवेळी करू नका, असं पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांच्यावर केली आहे.P. Chidambaram’s targeting of Priyanka Gandhi, rebuilding the party and saying don’t fight elections at the same time

चिदंबरम म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपवली होती. पण, निवडणूक प्रचार आणि पक्षाची पुनर्बांधणी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करू असं त्या म्हणाल्या.पण, आधी पक्षाची पुनर्बांधणी करावी. त्यानंतर उत्तप्रदेशात निवडणूक लढवावी, असं त्यांना सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही. गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची अवस्था गंभीर झाली हे सर्वांनाच माहिती आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसचा पराभव झाला.

उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाचवेळी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आधी पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे होती. त्यानंतर निवडणूक लढविणे गरजेचे होते. पण, दुदैर्वाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाचवेळी झाली. काँग्रेसमध्ये अनेक कमतरता आहेत.

मी त्यांच्या निदर्शनास आणू दिल्या आहे. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांनी काही कमतरता निदर्शनास आणून दिल्या आहेत, असेही चिदंबरम यांनी सांगितले.काँग्रेसमधील काही बंडखोर नेत्यांची सातत्याने बैठक सुरू आहे.

त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पण, पक्ष फुटू नये यासाठी चिदंबरम यांनी आवाहन केले आहे. प्रत्येकांनी आपआपल्या प्रदेशात जाऊन पक्षाची बांधणी करावी, असं आवाहन देखील चिदंबरम यांनी केले.

P. Chidambaram’s targeting of Priyanka Gandhi, rebuilding the party and saying don’t fight elections at the same time

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती