Kolhapur Byelection : शिवसेनेची काँग्रेससाठी माघार; भाजपचे पदाधिकारी राजू शेट्टींना भेटले; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रंगायला सुरुवात!!


प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने सत्यजित कदम यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे केली आहे, तर शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारासाठी माघार घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सूतोवाच केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. Kolhapur Byelection shivsena congress back

– राजेश क्षीरसागर यांची भूमिका काय?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत साठी शिवसेनेने जरी काँग्रेस उमेदवारासाठी माघार घेतली असली तरी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेने पक्ष म्हणून माघार घेतली असली तरी जर राजेश क्षीरसागर हे बंडखोर म्हणून उभे राहणार असतील तर शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहील?, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

– भाजपा – राजू शेट्टी जवळीक

त्याच वेळी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर आणि समरजित सिंह घाडगे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे राजू शेट्टी यांचा कल भाजपकडे असल्याचे आत्ता दिसत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना मदत करायची ठरवली तर निवडणुकीचे पारडे भाजपच्या बाजूने झुकू शकते. अशा स्थितीत काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा परिस्थितीत कसे पाठबळ देतात?, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

– भाजपचा “पंढरपुर पॅटर्न”

पण या निमित्ताने आज दिवसभर च्या घडामोडी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रंगायला लागल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पंढरपूर पॅटर्न राबवणार, असे स्पष्ट केले आहे. “मॅन टू मॅन” प्रचार म्हणजे पंढरपूर पॅटर्न असे ते म्हणाले आहेत. भाजपचे नेते मोठ्या सभा तर घेतीलच पण प्रत्येक मतदाराला भेटण्यावर भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या भर असेल हा आमच्या दृष्टीने पंढरपूर पॅटर्न आहेत असे ते म्हणाले आहेत. आता या पंढरपूर पॅटर्नवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी तोड काढतात?, हे पाहणे देखिल इंटरेस्टींग असणार आहे.

Kolhapur Byelection shivsena congress back

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात