राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली. NCP

प्रशांत किशोर नवे रणनीतीकार

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे, आता रणनीती बदलणार आणि रणनीतीकार बदलणार आहे नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला बाजूला सारून प्रशांत किशोर या रणनीतीकाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीती ठरवायचे काम देणार आहे. येत्या एक जून पासून प्रशांत किशोर म्हणे, राष्ट्रवादीची रणनीती ठरवायच्या कामाला लागणार आहेत. अर्थात मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपैकी अजून तरी कोणी त्या बातमीची पुष्टी केलेली नाही.

पण म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस रणनीती बदलेल रणनीतीकार बदलेल, पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणेल?? आणि त्याचवेळी भाजप आणि शिंदे हे काय शेंगांची टरफले सोडत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ आली.

छोटे पंख, छोटी झेप

पण राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांनी सत्तेसाठी जन्माला घातलेला पक्ष आहे. तो संघर्षासाठी जन्माला घातलेला पक्ष नाही. शरद पवारांनी किंवा अजित पवारांनी फार मोठा संघर्ष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवलेला नाही, तर त्यांनी कायमच सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष पोसलाय. त्यामुळेच प्रशांत किशोर अशी कोणती रणनीती ठरवणार की ज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला एवढे मोठे पुनरुज्जीवन मिळेल की त्यातून त्या पक्षाच्या नेत्याला एकदम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळेल. तसे काहीही घडण्याची शक्यता नाही. कारण मुळात राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अखंड पक्षाची ताकद सुद्धा कधी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली नव्हती आणि त्याच्या नेतृत्वाची झेप सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे गेलेली नव्हती.

राजकीय अविश्वासाचा फेविकॉल

अशा स्थितीत प्रशांत किशोर यांनी कितीही मोठी रणनीती ठरवून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांना पुढे केले किंवा अगदी तरुण तुर्क म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे प्रतिमा वर्धन केले, तरी मूळात पवार नावाच्या आडनावाला चिकटलेला राजकीय अविश्वासाचा फेविकॉल निघण्याची शक्यता नाही‌. कारण पवार म्हणजे राजकीय विश्वासघात आणि सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी हे समीकरण महाराष्ट्राने गेल्या ६० वर्षांमध्ये पाहिले. अगदी अजित पवारांनी सुद्धा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्यासाठी शरद पवारांना खरा – खोटा दगाच दिला होता.



भाजप शिवाय पानही हलणे कठीण

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर नरेश अरोरा यांच्या सल्लागारीतून सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. त्यांनी उपमुख्यमंत्री पद पण स्वीकारले, पण नंतर दोनच महिन्यांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून पवारांच्या घरातल्यांची सत्तेची पकड राष्ट्रवादी काँग्रेस वर मजबूत करण्यासाठी पावले टाकली. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या भोवती वापर करा आणि फेका असे संशयाचे जाळे निर्माण झाले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हसन मुश्रीफ या नेत्यांचा वकूब कितीही छोटा मोठा असला आणि तो पक्ष चालविणे इतपत मोठा नसला, तरी त्यांची ज्येष्ठता नाकारण्यात काही मतलब नव्हता. पण तरी पार्थ पवार याचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी सुनेत्रा पवारांनी पक्षातल्या ज्येष्ठांना डावलल्याची भावना निर्माण झाली. पक्षातले ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या आश्रयाला गेले. पण त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही आश्रयाला जाऊन आले. कारण भाजप शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पानही हलू शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली.

मुलांचे बस्तान बनविताना घाई

… आणि इथेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकारणाची मेख दडली आहे. पार्थ आणि जय पवार यांचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी सुनेत्रा पवारांनी ज्येष्ठांना दूर करायचा डाव खेळला खरा, पण तो त्यांच्याच अंगलट आलेला दिसला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तरी त्यांना सर्व नेत्यांना समाविष्ट करून राजकारण करता येत नाही. त्यांना पक्ष अखंड टिकवता येणार नाही, असे चित्र निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने हा गडबडीचा मुद्दा ठरला. पार्थ आणि जय पवार यांचे बस्तान बसवण्यात घाई झाली.

भाजप आणि शिंदे मारतील पाचर

अशावेळी प्रशांत किशोर यांनी कितीही राष्ट्रवादी काँग्रेसला कल्हई केली, पार्थ आणि जय पवार यांचे प्रतिमावर्धन केले आणि सुनेत्रा पवारांचे नाव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकूण पट पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविणे त्यांच्यासाठी अवघड आहे. कारण ज्यावेळी प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीती ठरविण्याच्या प्रक्रियेत असतील त्याचवेळी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपापले डाव टाकण्यात मग्न राहतील. अशा वेळेस सत्तेच्या सगळ्या किल्ल्यावर भाजपच्या ताब्यात असतील, तर प्रशांत किशोरच काय पण अन्य कुठलाही रणनीतीकार महाराष्ट्रात यशस्वी ठरण्याची शक्यता दुरापास्तच राहील. कारण प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमावर्धनासाठी वेगवेगळ्या रणनीती ठरवतील, पण पवार नावाच्या आडनावाला पुन्हा विश्वासार्हता मिळवून देणे त्यांना कठीण जाईल. शिवाय भाजप आणि शिंदे नेमक्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायमची पाचर मारून ठेवतील, ते वेगळेच!!

Prashant Kishor new political strategists for NCP; but the word trust does not match with Pawars

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात