विशेष प्रतिनिधी
मुंबई : तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार? करीना आणि सैफ मुलाचे नाव कलाम, इरफान, जाकीर काहीही ठेऊ शकले असते. मात्र तैमूर आणि जहांगीर का ठेवले? तर शिख आणि हिंदूंना कमी लेखण्याचा हा एक डाव आहे. असे वाटतंय मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत, अशी टीका अभिनेता सैफी अली खान आणि करीना कपूर यांच्यावर केली जात आहे.Saif-Kareena to name third child Aurangzeb, forming Mughals IPL team, netizens target after second childs name
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या दुसºया मुलाचे नाव पहिला मुलगा तैमूरप्रमाणेच मुघल बादशहाच्या नावावर ठेवले आहे. जहांगीर अली खान असे नाव ठेवल्याचे करीनाने सोशल मीडियावर लाइव्ह चॅट दरम्यान सांगितले. त्यानंतर दोघेही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
सैफ आणि करीनाच्या लहान मुलाचे खरे नाव जहांगीर आहे हे समजल्यावर लोकांनी सोशल मीडियावर सैफिनाला ट्रोल करायला सुरुवात केली, मीम्सचा पाऊसही पाडला .एका नेटक-याने लिहिले, तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार?मुघल बादशहा अकबरचा मुलगा सलीम याचे नाव जहांगीर होते. जहांगीर हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ जगावर राज्य गाजवणारा असा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App