राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजपा खासदारांची पंतप्रधान घेणार झाडाझडती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेतील खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आल होता. मात्र, तरीही काही खासदारांनी दांडी मारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता  या दांडीबहाद्दर खासदारांची पंतप्रधान स्वत: झाडाझडती घेणार आहेत.Prime Minister Narendra Modi expressed displeasure over the non presence of MPs in Rajysabha

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधकांनी पेगॅसस, कृषी कायद्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागतं आहे. याच वेळी  सत्ताधारी भाजपाचे खासदार गैरहजर राहात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.  गैरहजर राहणाऱ्या  खासदारांची यादी मागितली आहे.



न्यायाधिकरण सुधारणा विधेयक २०२१ राज्यसभेत मांडल्यानंतर गैरहजर असलेल्या खासदारांबद्दल पंतप्रधानांनी नाराजी व्यक्क केली आहे. हे विधेयक विरोधकांच्या गोंधळात मंजूर झाले. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यावर मतांचे विभाजन करण्याची मागणी करण्यात आली.

प्रस्तावाच्या बाजूने ४४ मतं, तर विरोधात ७९ मत पडली. यामुळे विरोधकांची मागणी रद्द झाली. त्यानंतर बिल आवाजी मतदानाने पारित झालं. या मतदानावेळी भाजपाचे काही खासदार गैरहजर होते. या खासदारांची यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली आहे.

Prime Minister Narendra Modi expressed displeasure over the non presence of MPs in Rajysabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात