केरळ सरकारचा कद्रुपणा, ऑलिम्पिक पदकविजेत्या हॉकी संघातील गोलकिपरला ना पुरस्कार ना कौतुक


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचे संपूर्ण देश कौतुक करत आहे. आपापल्या राज्यांतून खेळाडूंना राज्य सरकारांनी मोठमोठी बक्षीसे जाहीर केली आहेत. मात्र, केरळ सरकारने मात्र कद्रुपणा दाखवित पुरुष हॉकी संघाचा गोलकिपर पी. आर. श्रीजेश याचे कोणत्याही प्रकारे कौतुक केले नाही. त्याला बक्षीसही जाहीर करण्यात आलेले नाही.Kerala government’s rudeness, no award or appreciation to the goalkeeper of the Olympic medal winning hockey team

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करून इतिहास रचला. यामध्ये गोलरक्षक पीआर श्रीजेश याची कामगिरी महत्वाची ठरली. त्याच्या कौशल्याचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. मात्र, जो केरळचा आहे, संघाच्या सामन्यांमध्ये त्याच्या कौशल्याबद्दल कौतुक केले गेले. मात्र, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी श्रीजेशला कोणतेही बक्षीस जाहीर केलेल नाही.ज्येष्ठ धावपटू अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली, केरळ सरकारने श्रीजेशनला बक्षीस दिले नाही हा आरोप खरा आहे. ऑलिम्पिकमधील अनेक खेळाडूंना राज्यात परत येण्यापूर्वीच त्यांच्या सरकारांनी बक्षीसे जाहीर केली आहे. मात्र, श्रीजेश परत आल्यानंतरही केरळ सरकारने बक्षीस जाहीर केले नाही.

अंजूनेही यापूर्वी पदकविजेती कामगिरी केली होती. परंतु, त्यावेळीही केरळ सरकारने रोख बक्षीस देण्यास टाळाटाळ केली होती. याउलट तामीळनाडू सरकारने तिला रोख बक्षीस दिले होते. याबाबत अंजू म्हणाली, एक कोटी रुपयांचा पुरस्कार घोषित करणे कठीण नाही. सरकार प्रायोजकत्वाद्वारे ते गोळा करू शकते. परंतु त्यांच्या हेतूबद्दलच शंका आहे.

केरळ राज्य सरकारने श्रीजेशला बक्षीस जाहीर केले नसले तरी येथील नागरिकांकडून मात्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुबईमध्ये असलेल्या व्हीपीएस हेल्थकेअरचे अध्यक्ष एमएस डॉ.शमशीर वायालिल यांनी 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले.

या उलट मध्य प्रदेश सरकारने हॉकी संघातील विवेक सागर आणि नीलकांता शर्मा यांना प्रत्येकी एक कोटी रुपये जाहीर केले आहेत. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना मणिपूर सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) म्हणून नियुक्ती केली आहे.

हरियाणा सरकारने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राला रोख सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. महिला हॉकी संघाने पदक मिळविले नाही पण कडवी झुंज दिली. त्यामुळे या संघात असलेल्या हरियाणाच्या आठ खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Kerala government’s rudeness, no award or appreciation to the goalkeeper of the Olympic medal winning hockey team

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी