वृत्तसंस्था
पिंपरी : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकानंतर आता नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये परतलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनाची धास्ती वाढली आहे. Omicron Scare in Pune District
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरला. १५ देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार राज्य सरकारने ओमायक्रॉन विषाणूला अटकाव करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. परदेशी लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट होत आहे. याच तपासणी प्रक्रियेत नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App