संसदेच हिवाळी अधिवेशन : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं अद्याप माहिती दिली नाही-आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट


  • लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु असून कालच्या दिवशी ऐतिहासिक चर्चा पार पडली. काल रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा सुरू होती.
  • मध्यरात्री लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.आज पुन्हा कोरोनावर चर्चा सुरु आहे. काल दिवसभरात 74 खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला. Winter session of Parliament: How many died due to lack of oxygen? Maharashtra has not given information yet – Health Minister made it clear

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती मात्र, महाराष्ट्राने अद्याप ती माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. 19 राज्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे .

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. मनसुख मांडवीय यांनी ॲाक्सिजनमुळे किती कोरोना रूग्ण दगावले याची माहिती अद्याप महाराष्ट्र सरकारने दिली नाही, अशी माहिती दिली. केंद्र सरकारला केवळ 19 राज्यांनी माहिती दिली. केवळ पंजाबनं सांगितले की 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, असं मनसूख मांडवीय म्हणाले.केंद्राला माहिती कळवणारी राज्यं

अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम त्रिपुरा, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी माहिती दिली.

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ऑक्सिजन अभावी किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत कोरोनावर चर्चा केली.

Winter session of Parliament : How many died due to lack of oxygen? Maharashtra has not given information yet – Health Minister made it clear

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*