मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वतंत्रपणे लढणार आहे, तर ग्रामीण भागातल्या निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. MNS will fight in all municipalities including Bai, while Swabhimani of Shitti will fight independently in rural areas

मुंबई महापालिकेत सर्व 227 वॉर्डांमध्ये मनसे स्वतंत्रपणे आपले उमेदवार उतरवेल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला तसे आदेश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी मुंबई सह बाकीच्या महापालिका क्षेत्रातील प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.


सदाभाऊ खोत – राजू शेट्टी : दोन माजी मित्र भिडले; “बारामती”च्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!


माजी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागात महाविकास आघाडी अथवा शिवसेना भाजप युती यापैकी कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मला शिवसैनिकही स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा आग्रह धरतात. बाकीच्या पक्षांमधले कार्यकर्तेही माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा आपला इरादा असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

मनसे आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची ताकद महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात मर्यादित असली तरी ती दखल घेण्याजोगी निश्चित आहे. राजू शेट्टी यांचे नेटवर्क ग्रामीण भागात मजबूत आहे, तर मनसे कडे राज ठाकरे यांच्या सारखी तोफ आहे. शिवाय अमित ठाकरे हे देखील सध्या पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

या दोन्ही पक्ष संघटनांनी शहरी आणि ग्रामीण भागातील निवडणूक जाहीर केल्याप्रमाणे स्वतंत्रपणे लढवली, तर त्याचा जनमानसावर आणि निवडणूक निकालावर वेगळा परिणाम होणे अपरिहार्य आहे. राज ठाकरे आणि राजू शेट्टी या दोन्ही महत्त्वाच्या या नेत्यांच्या निर्णयाचा फटका महाविकास आघाडीला की शिवसेना-भाजप युतीला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MNS will fight in all municipalities including Bai, while Swabhimani of Shitti will fight independently in rural areas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात