सदाभाऊ खोत – राजू शेट्टी : दोन माजी मित्र भिडले; “बारामती”च्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!


नाशिक : दोन माजी मित्र भिडले आणि बारामतीच्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!, असेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका गोष्टीचे वर्णन करावे लागेल. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे ते दोन माजी मित्र आहेत. आता ते एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत. पण एकेकाळी दोघांचे कॉमन शत्रू असणारे बारामतीकर याच मुद्द्यावरून या दोघांनी एकमेकांवर बिल फाडले आहे. Sadabhau khot and raju shetty targets each other over hotel dues

त्याचे झाले असे : सदाभाऊ खोत सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ते एका हॉटेलमध्ये बसले होते. तिथे खाल्ल्यानंतर मालक अशोक शिनगारे यांनी जुने बिल चुकते करा अशी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्याचा व्हिडिओ आणि बातमी व्हायरल झाली. त्यावरून महाराष्ट्र दोन दिवस राजकारण रंगले. अशोक शिनगारे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुद्दामून आपल्याला घेरण्यासाठी हा बनाव रचला होता, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.



परंतु, त्यानंतर अशोक शिनगारे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याची ग्वाही राजू शेट्टी यांनी दिली. इतकेच नाही तर सदाभाऊंचे बिल भीक मागून चुकवू, असा टोलाही लगावला. त्यावरून चिडलेल्या सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना प्रतिटोला लगावला आहे माझेच बिल भीक मागून कशाला चुकवता? तुम्हीच बारामतीचा फुकटचा आमरस खाल्ला आहे. त्याचे बिल पण भीक मागून चुकते करा, असा प्रतिटोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

– बारामतीची आमरस पुरी

शरद पवारांचे कट्टर विरोध असणाऱ्या राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विधान परिषदेची आमदारकी मिळविण्यासाठी शरद पवारांच्या गोविंद बागेतल्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथे यांच्यासमवेत आमरस पुरीचे जेवण घेतले होते. हे आमरस पुरीचे जेवण उत्तम होते. पण राजू शेट्टींना राष्ट्रवादीकडून अद्याप आमदारकी मात्र मिळालेली नाही. राष्ट्रवादीने शिफारस केलेली राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची आमदारकी राज्यपाल महोदयांनी अजूनही लटकवून ठेवली आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना बारामतीच्या आमरसावरून टोला हाणला आहे.

– पवारांचे कट्टर विरोधक ते एकमेकांचे वैरी

सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे एकेकाळचे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते होते. दोघेही पवारांचे कट्टर विरोधक होते. भाजपबरोबर असताना सदाभाऊ मंत्री होते, तर राजू शेट्टी लोकसभेचे खासदार होते. सध्या सदाभाऊ माजी मंत्री आहेत. त्यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देऊन नंतर मागे घ्यायला लावली आहे. राजू शेट्टी लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. विधान परिषदेचे आमदार केले की मिळालेली नाही. त्यामुळे कोणत्या सभागृहाचे सदस्य नाहीत. राष्ट्रवादीने त्यांना आमदारकीचे दिलेली आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही.

Sadabhau khot and raju shetty targets each other over hotel dues

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात