राष्ट्रपतीपद की पक्षाध्यक्षपद? : काँग्रेसचा सुशीलकुमार शिंदेंवर पुन्हा राजकीय प्रयोग??


नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना उद्या सोमवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी अटक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मध्ये जोरदार घडामोडी सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आपले टाकत पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे. Congress’s political experiment on Sushilkumar Shinde again

राहुल गांधी यांच्या उद्याच्या अटकेची शक्यता आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट, या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आता अति वरिष्ठ पातळीवर अक्षरशः निर्नायकी अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याकडे तात्पुरते कार्यकारी पक्षाध्यक्षपद सोपवायचे की त्यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची माळ घालायची यावर काँग्रेस पक्षात खल सुरू असल्याची बातमी आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.

– उपराष्ट्रपतीपदाचा प्रयोग

अर्थात सुशीलकुमार शिंदे यांच्यावर काँग्रेसने पहिल्यांदाच हा राजकीय प्रयोग चालवलेला नाही. सन 2002 मध्ये काँग्रेसने बहुमत नसताना सुशीलकुमार शिंदे यांना भैरोसिंह शेखावत यांच्या विरोधात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी देखील सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला हरणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने मैदानात उतरवल्याची प्रतिक्रिया नंतर व्यक्त केली होती.


राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांनी पारडे फिरवले असते; संजय राऊतांकडून स्तुती की डिवचणे??


– राष्ट्रपती पदासाठी बहुमत नाही

2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देखील काँग्रेसकडे बहुमत नाही. काँग्रेसप्रणीत कोणत्याही विरोधी पक्षाचा उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशस्वी होण्याची शक्यता नाही. तरी देखील सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी गळ घालणार असेल तर हा सुशीलकुमार शिंदे यांच्यावरचा दुसरा राजकीय प्रयोग ठरेल. अर्थात स्वतः सुशीलकुमार शिंदे आपल्यावर हा राजकीय प्रयोग करून घेतील का?, याविषयी देखील शंका व्यक्त केली जात आहे.

– मोठी संघटनात्मक जबाबदारी शक्य

परंतु काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे काही महत्त्वाची जबाबदारी विशेष कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येते आहे का?, हे पाहणे देखील पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवरून महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील सगळ्यात वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे दोन नेते मात्र दिल्लीत आहेत.

Congress’s political experiment on Sushilkumar Shinde again

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!