विधान परिषद : मतांच्या जुळवाजुळवी आधी कापाकापी!!; देशमुख, मालिकांची मते कापली; रवी राणांविरुद्ध अटक वॉरंट!!


प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजप कडून होत असताना दुसरीकडे एकमेकांच्या मतांची कापाकापी देखील जोरात सुरू आहे. deshamukh, cut the opinions of the series; Arrest warrant against Ravi Rana!

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मते खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते त्यांच्या नाकदुऱ्या काढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मथे मते हायकोर्टानेच काटल्यामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट काढून त्यांचे भाजपला जाणारे संभाव्य मत कापण्याचा प्रयत्न केला आहे.

हनुमान चालीसा प्रकरणात रवी राणा जामिनावर आहेत पण अमरावतीतील शाई फेक प्रकरणात यांच्याविरोधात अटक वॉरंट काढून त्यांच्या अटकेसाठी अमरावती पोलीस मुंबई पोहोचले आहेत. रवी राणा घरात नसल्यामुळे अटक वॉरंट कोणी घेतले नाही. पण आपण या अटक वॉरंटला कायदेशीर उत्तर देऊ पण विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.

– हितेंद्र ठाकूर पवारांच्या गळाला की भाजपच्या?

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान केले. पण विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांनी आघाडीलाच मतदान करावे यासाठी स्वतः शरद पवारांनी फिल्डिंग लावली आहे. ही फिल्डिंग भेदण्यासाठी आज भाजपचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यासाठी त्यांनी लोकल प्रवास केला. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला. सुमारे 3 तास चर्चा झाली तरी हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे 2 आमदार नेमके कोणाला मतदान करणार आहेत?, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक घेतली आहे. त्यांना मार्गदर्शन केले आहे. मतांचा कोटा जाहीर झालेला नाही.

भाजपची उद्या बैठक

भाजपचे नेते उद्या ताज हॉटेलमध्ये बैठक घेणार आहेत पण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर बॉम्ब टाकला आहे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हलली, पण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळून पडेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडणार, असे भाकीत चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.

deshamukh, cut the opinions of the series; Arrest warrant against Ravi Rana!

 

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात