दहावीचा निकाल जाहीर : महाराष्ट्राची सरासरी 96.94 % ; कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27 % निकाल!!

प्रतिनिधी

मुंबई : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या SSC म्हणजेच दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 96.94 % इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आता लागला आहे,  दहावीचा निकाल 96.94 % तर कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27 % निकाल लागला आहे. 10th results announced: Maharashtra average 96.94%

कोकण विभागाने बाजी मारली

दहावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. सर्वच विभागांमध्ये  मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या वर्षीची दहावी परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान पार पडली होती.दहावीचा विभागनिहाय निकाल

 पुणे: 96.96%
 नागपूर: 97%
 औरंगाबाद: 96.33%
 मुंबई: 96.94%
 कोल्हापूर: 98.50%
 अमरावती: 96.81 %
 नाशिक: 95.90%
 लातूर: 97.27% 
 कोकण: 99.27%

या निकालात मुलींनी बाजी मारली आहे, मुलींचा निकाल 97.96 % तर मुलांचा निकाल 96.06 % इतका लागला आहे.

या परिक्षेत विभागीय मंडळांमधुन पुढीलप्रमाणे 122 % विद्यार्थ्यांनी 100 % गुण मिळवले आहेत.
पुणे 5
औरंगाबाद 18
मुंबई 1
कोल्हापूर 18
अमरावती 8
नाशिक 1
लातूर 70 
कोकण 1
अशा 122 विद्यार्थ्यांनी 100 % गुण मिळवले.

दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला 16,38, 964  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506  मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458  एवढी आहे.

10th results announced: Maharashtra average 96.94%

महत्वाच्या बातम्या