SSC Result 2022 : दहावीचा निकाल उद्या 17 जूनला होणार जाहीर

प्रतिनिधी

मुंबई : दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या मुलांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र स्टेट बाोर्ड ऑफ सेकेंडरी अॅंड एज्युकेशन मार्फत 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. SSC Result 2022: X results will be announced tomorrow, June 17

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांना नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. मंडळाकडून 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता 17 जूनला दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल.

SSC Result 2022: X results will be announced tomorrow, June 17

महत्वाच्या बातम्या