दानवे × देसाई : राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले; विधान परिषद निवडणुकीत “मांजराची पिल्लं” गाजताहेत!!


नाशिक : राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्ही निवडणुका माणसांच्या आहेत की प्राण्यांच्या असा सवाल आता तयार झाला आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत “घोडे” गाजले. “घोडेबाजार” गाजला. आता विधान परिषद निवडणुकीत मांजराची पिल्ले गाजत आहेत. Maharashtra state council Elections: raosaheb danve patil – subhash desai targets each other

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अपक्ष आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर आमदारांना घोडे का म्हणता?, आम्ही 3 लाख लोकांमधून मते घेऊन विजयी झालो आहोत असे शरसंधान अनेक अपक्ष आमदारांनी संजय राऊत यांच्यावर साधले होते. तो विषय राज्यसभा निवडणुकीपर्यंत निकालापर्यंत गाजत राहिला. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभवाचा झटका बसला. संख्याबळ नसतानादेखील भाजपचे तीनही उमेदवार जिंकले.



– दानवे पाटलांचा हल्लाबोल

आता विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सावध पावले टाकत असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. मांजर जशी पिल्ले घेऊन फिरत राहते तसे शिवसेना आपल्या आमदारांना घेऊन फिरते आहे, असे टीकास्त्र रावसाहेब दानवे पाटील यांनी सोडले आहे.

सुभाष देसाई यांचे प्रत्युत्तर

रावसाहेबांच्या वक्तव्याला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी छेद दिला आहे. आम्हाला शिवसेनेच्या आमदारांची भीती नाही. पण मांजर जशी पिल्ले घेऊन फिरते त्यात प्रेम असते, तसेच शिवसेनेचे आमदारांवर प्रेम आहे, असे समजा असे प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी दानवे पाटलांना दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावाही सुभाष देसाई यांनी केला आहे.

– शतरंज के माहीर खिलाडी

त्याचवेळी रावसाहेब पाटील दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शतरंज के माहीर खिलाडी असे संबोधून यावेळी राज्यसभा निवडणुकीत वेगळा डाव टाकला होता. तो आता महा विकास आघाडीला माहिती झाला आहे त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत वेगळा डाव टाकून भाजपचे उमेदवार निवडून आणू व्यक्ती नव्हे तर पक्षांचा पराभव करू, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून एकनाथ खडसे यांना धोका उत्पन्न झाल्याची मुंबईतल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Maharashtra state council Elections: raosaheb danve patil – subhash desai targets each other

 

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात