देहूतील (न)भाषण : अजितदादा म्हणाले, विषय संपला!!; फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतून षडयंत्र!!


प्रतिनिधी

मुंबई : देहूतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्रीराम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मोठा गदारोळ केल्यानंतर आज पहिल्यांदाच स्वतः अजितदादा या विषयावर बोलले आहेत. “देहूतील कार्यक्रम चांगला झाला. सर्व वारकरी संप्रदाय येथे आला होता. Fadnavis said, a conspiracy by the NCP against Ajit Pawar

भाषणाच्या विषयाबद्दल मला काही बोलायचे नाही. कार्यक्रम झाला. विषय संपला. पुढे चला, अशा शब्दात अजितदादांनी या संपूर्ण विषयावर आज पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बारामतीत गौतम अदानी यांच्या हस्ते सायन्स अंड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर अजितदादा पत्रकारांशी बोलत होते.



याच विषयावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या (न) भाषणावरून त्यांच्याच विरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. स्वतः पंतप्रधानांनी अजितदादांना भाषण करायला सुचवले होते. परंतु अजित दादांनी भाषण केले नाही. कार्यक्रम उत्तम झाला त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असल्यास सांगता येत नाही. पंतप्रधानांचे अजितदादांशी चांगले संबंध आहेत. चांगल्या कार्यक्रमात मिठाचा खडा कोण टाकायचा प्रयत्न करतेय हे तुम्हीच पाहा. झाले असेल तर ते अजितदादा यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून षडयंत्र झाले असावे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

– सुप्रिया सुळे यांनी विषय लावून धरला

अजितदादांच्या भाषणाचा विषय खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाच्या दिवशी उचलून धरला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोराचा चढला आणि त्यांनी ठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली होती.

– राजकीय योगायोग

या पार्श्वभूमीवर कार्यक्रम उलटून गेल्यानंतर तीन दिवसांनी स्वतः अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच दिवशी बोलले आहेत हा राजकीय योगायोग देखील विसरता येत नाही. हा योगायोग देखील बरीच राजकीय भाष्य करून जातो

Fadnavis said, a conspiracy by the NCP against Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात