नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली असताना नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढला आहे, तर महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धास्तीतून बैठकांवर बैठका घेत आहेत. Maharashtra state council Elections : MVA leaders targets BJP, but affared of their own MLAs
– नाना पटोलेंचा भाजपवर आरोप
महाविकास आघाडीच्या आमदारांना केंद्रीय तपास संस्थांचे धमक्यांचे फोन येत आहेत. भाजपला मतदान करा नाहीतर चौकशी आणि तपास चक्रात अडकवून अशा धमक्या तपास संस्थांचे अधिकारी देत आहेत. या फोनचे आम्ही रेकॉर्डिंग केले आहे. योग्य वेळी ते बाहेर आणू, असे वक्तव्य करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले आहे.
– अजितदादांना चमत्काराची अपेक्षा
त्याचबरोबर राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्य पण विधानपरिषद निवडणुकीत कोणता चमत्कार होईल हे सगळा महाराष्ट्र पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून आपला रोख नेमका कोणाकडे आहे?, हे गुलदस्त्यात ठेवले आहे.
– नानांच्या वक्तव्याला अजितदादांचा छेद
मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांना केंद्रीय तपास संस्थांचे फोन येत असल्याची आपल्याला माहिती नाही, असे वक्तव्य करून अजितदादांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याला छेद देखील दिला आहे.
– बैठकांना जोर
एकीकडे वक्तव्यांचा अशा फैरी झडत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांना देखील जोर आला आहे. भाई जगताप आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी शरद पवार साहेब आपल्या अनुभवाच्या बळावर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आणतील, असा दावा भाई जगताप यांनी या भेटीनंतर केला आहे.
– राष्ट्रवादीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस मच्या सर्व आमदारांची बैठक आज सायंकाळी 7.00 वाजता मुंबईत होणे अपेक्षित आहे. या बैठकीत स्वतः शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस खडसे कार्ड खेळणार असल्याच्या बातम्या आहेत पण हे खडसे कार्ड नेमके कसे आणि कोण खेळणार आहे त्याचा भाजपवर कितीसा परिणाम होणार आहे?, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
– शिवसेना आमदारांची रंगीत तालीम
दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांची मतदानाची रंगीत तालीमच पक्षाच्या नेत्यांनी आज घेतली आहे. मतदान प्रत्यक्ष कसे करायचे याचे प्रशिक्षण शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांना दिले आहे. मतदान करताना काही चुका होऊ शकतात. मतदान कसे बाद होऊ शकते? ते कसे टाळायचे? याचे प्रशिक्षण शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये जाऊन नेत्यांनी दिले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते. शिवसेनेच्या आमदारांची मतदान प्रक्रिया स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मॉनिटर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना एकीकडे नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढले आहेत. पण राज्यसभा निवडणुकीसाठी पराभवाची नामुष्की उडवून नये यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जास्तीच्या बैठका देखील सुरू झाले आहेत. हेच यातून दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App