प्रतिनिधी
मुंबई : एरवी आव्वाज कुणाचा!! शिवसेनेचा!! असे म्हणत जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा होणारा शिवसेनेचा वर्धापनदिन आज मात्र जल्लोषात नव्हे, तर दबावात आणि मैदानात नव्हे, तर हॉटेलात साजरा होत आहे. कारण वेळच तशी आली आहे!!Legislative Council elections: Shiv Sena’s anniversary today is not in celebration, under pressure; Not on the field, in the hotel !!
राज्यसभा निवडणूक जबरदस्त फटका बसल्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत ताकही फुंकून पिण्याचे धोरण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना हॉटेल वेस्ट इन मध्ये ठेवले आहे. त्यामुळे आज १९ जून रोजीच शिवसेनेचा हा वर्धापनदिन याच हॉटेलमध्ये साजरा करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार
वर्धापनदिना निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या मतदानाला काही तास शिल्लक राहिले असताना सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून आमदारांना एकत्र ठेवले आहे. शिवसेनेने आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने २ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
गुप्त मतदानाची भीती
परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. शिवसेनेचे सगळे आमदार आणि समर्थक आमदार बैठकीला जमले आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. अतिरिक्त मते कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आदित्य ठाकरे हे देखील आमदारांशी संपर्क ठेवून आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more