भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??


प्रतिनिधी

मुंबई : भाजप म्हणतोय आम्हाला आहे “गणिता”चा आधार, महाविकास आघाडीची फोडाफोडीवर मदार पण फडणवीसांच्या नावाने होणार कोण गपगार??, अशी चर्चा सुरू आहे.Maharashtra state council Elections : devendra Fadanavis claims political mathematics is with BJP

कोणताही पक्ष हा आपला उमेदवार जिंकावा यासाठी प्रयत्न करतो, राजकारणात कोणीही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जिंकवण्यासाठी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार धोक्यात टाकू शकत नाही. भाजपाने पाचवा उमेदवार उभा केला आहे, तर गणिताच्या आधारे केला आहे हे महाविकास आघाडीला माहिती आहे. त्यामुळे कुणाला याचा फटका बसणार याच्या नादात ते एकमेकांचे आमदार फोडत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.



महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना नाना पटोले गंमतीदार बोलतात ते ऐकायचे आणि सोडून द्यायचे असते. १० तारखेला राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आहे. परंतु आता भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आल्यानंतर विधान परिषद निकालानंतर तो कोसळेल. तुम्ही सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपली रणनीती यशस्वी होईल, असा दावा आमदारांशी बोलताना फडणवीस यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेने सचिन आहिर, आमश्या पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

Maharashtra state council Elections : devendra Fadanavis claims political mathematics is with BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात