विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तरी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांचे हेच ठरेना, लढायचं की फक्त पाडायचं??, याचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी नवी तारीख दिली आहे, 20 ऑक्टोबर!!Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी फक्त सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले आहे. मनोज जरांगे यांना हवे असलेले ओबीसी मधून आरक्षण फक्त फडणवीस देत नाहीत असा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात फडणवीस यांनी दिलेले आव्हान स्वीकारायला किंवा त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला मनोज जरांगे यांनी तयारी दाखवलेली नाही, ती म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या!!
शिवाय मनोज जरांगे यांच्याकडे त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार 800 इच्छुकांनी अर्ज केले आहे. या सगळ्यांना जरांगे यांच्या लोकप्रियतेच्या बळावर निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे या इच्छुकांचा एक प्रकारे जरांगे यांच्यावर दबाव तयार झाला आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढवायची की फक्त भाजपचे उमेदवार पाडायचे, हे ठरविण्यासाठी जरांगे यांनी नवी तारीख दिली आहे. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे निवडणूक लढवायची की नाही याविषयीचा निर्णय घेणार आहेत.
पण याआधी जरांगे यांनी अनेक तारखा दिल्या होत्या, त्या तारखांपैकी काही तारखांना मराठा समाजाच्या बैठका देखील झाल्या होत्या. परंतु निवडणूक लढवायची की नाही, यावर जरांगे त्यावेळी निर्णय घेऊ शकले नव्हते. आता 20 ऑक्टोबरला अंतिम निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App