मुख्यमंत्री योगींनी दिले कडक निर्देश
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : Bahraich violence यूपीच्या बहराईचमध्ये रविवारी संध्याकाळी दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी दोन गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादाला हिंसक वळण लागले आणि काही लोकांनी घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. त्याचवेळी या दगडफेकीत दुर्गा माँच्या मूर्तीची मोडतोड झाली. यानंतर दुसऱ्या बाजूचे लोकही संतप्त झाले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनीही लाठीचार्ज केला.Bahraich violence
त्याचवेळी या जातीय हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बहराइच प्रकरणी आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. महसी भागात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. त्याचवेळी योगी यांनी या घटनेवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. हरडी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि महसी चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महसी तहसील येथील मूर्ती विसर्जनासाठी जात होती. यावेळी मिरवणुकीत गाणीही वाजवली जात होती. अचानक सोनार अब्दुल हमीद हा आपल्या मुलासह महाराजगंज नगरजवळ पोहोचला आणि शिवीगाळ करू लागला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. दरम्यान, काही लोकांनी त्यांच्या घरांवरून दगडफेक सुरू केली. दगडफेकीत दुर्गा माँच्या मूर्तीची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक थांबवत मंडळाच्या सदस्यांनीही विरोध सुरू केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App