विशेष प्रतिनिधी
पुणे : Vidhan Parishad शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा “ताटातले वाटी आणि वाटीतले ताटातचा” प्रयोग आज फलटण तालुक्यात रंगला. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शरद पवारांच्या पक्षात पाठवून स्वतः मात्र विधान परिषदेच्या आमदारकीची उरलेली मुदत टिकवण्यासाठी अजितदादांनाच साथ देण्याचे ठरविले.Vidhan Parishad
फलटण विधानसभा मतदारसंघातून अजितदादांनी ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती, ते दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, पण रामराजे नाईक निंबाळकर मात्र अजित पवारांच्याच राष्ट्रवादी थांबले. कारण त्यांची विधान परिषदेची 3 ते 4 वर्षांची मुदत अजून शिल्लक आहे. ते जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले असते, तर कदाचित त्यांना आमदारकी गमवावी लागली असती.
राष्ट्रवादीच्या आजच्या प्रवेश मेळाव्यात बाकी शरद पवारांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारला लाडक्या बहिणी आठवल्याची टीका त्यांनी केली. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रामराजे निंबाळकर यांची आठवण काढली. ते स्वतः जरी आमच्याकडे आले नाहीत, तरी संजीवराजेंना पाठवून त्यांनी चांगला निर्णय घेतला, असे जयंत पाटील म्हणाले. यातूनच रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन डगरींवर हात ठेवल्याचे स्पष्ट झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App