विशेष प्रतिनिधी
सातारा : Amol Kolhe हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अनेक जण महाराष्ट्रात “हरियाणा” घडवायची स्वप्ने बघत आहेत पण महाराष्ट्रात “हरियाणा” घडू शकणार नाही, कारण इथे शरद पवार उभे आहेत, असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी केला, पण कोल्हे यांनी या विधानातून भाजपला छेडले की काँग्रेसला डिवचले??, असा सवाल तयार झाला.Amol Kolhe
फलटण तालुक्यामध्ये संजीवराजे निंबाळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला, पण रामराजे निंबाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहून स्वतःची विधान परिषदेची आमदारकी वाचवली. संजीवराजे निंबाळकर यांच्या प्रवेशाच्या सभेत अमोल कोल्हे यांनी भाषण करताना हरियाणा निवडणुकीचा संदर्भ दिला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे अनेकजण महाराष्ट्रात “हरियाणा” घडवायची स्वप्ने पाहत आहेत, पण महाराष्ट्रात तसे घडणार नाही, कारण इथे शरद पवार उभे आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले. यातून अमोल कोल्हे यांनी भाजपला डिवचले की काँग्रेसला छेडले??, असा सवाल तयार झाला. कारण अप्रत्यक्षपणे अमोल कोल्हे यांनी भाजपला पराभूत करणे हा काँग्रेसचा “घास” नाही. तिथे शरद पवारांसारखेच नेते लागतात, असे काँग्रेस नेत्यांना सुनावले.
हरियाणातल्या अनपेक्षित पराभवाच्या सावटातून बाहेर पडून काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातील रणनीती आखत असताना अमोल कोल्हे यांच्यासारख्या पवारनिष्ठ नेत्याने काँग्रेसच्या हरियाणातल्या पराभवाच्या जखमेवरील ताजी खपली काढल्याने त्यांनी भाजप पेक्षा काँग्रेसलाच डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App