Eknath Shinde तुफान टोलेबाजी अन् एकनाथ शिंदे यांनी यासाठी मानले नाना पटोले यांचे आभार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नाना पटोले याचं मी आभार मानतो की, नार्वेकर यांच्यासाठी त्यांनी अध्यक्षपद रिक्त केलं. खरं आहे ते बोललं पाहिजे असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोले यांना टोला लगावला.
राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले. Eknath Shinde thanked Nana Patole for this

विरोधी पक्षाने सभागृहात सरकारच्या चांगल्या कामाला पाठिंबा द्यायचा असतो आणि चुकल्यावर कान धरायचाअसतो. पण यावेळी विरोधी पक्षाची अवस्था चिंताजनक आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदी जितके आमदार लागतात तितकेही नाहीत. हे चिंताजनक आहे. असं व्हायला नव्हतं पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे की नाही, त्यावर विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतील. तो त्यांचा अधिकार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात शायरी देखील केली. ते म्हणाले कर नाही, त्याला नाही डर…उसका नाम राहुल नार्वेकर…असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले. या शायरीनंतर रामदार आठवले आणि माझी आता युती झाली असं मिश्किल विधानही एकनाथ शिंदेंनी केलं.

शिंदे म्हणाले, शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले. ⁠आम्ही तिकडे लक्ष दिल नाही. आमच काम करत राहिलो. पहिले आम्ही दोघे होतो. नंतर अजितदादा आले. त्यांनंतर आमचं तीन शिफ्टमध्ये काम सुरु होतं, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकसभेला फेक नेरिटीव्ह केलं त्याचा फटका आम्हाला बसला. आता विरोधकांचा पराभव झाल्यावर ईव्हीएम मशीनवर खापर फोडताय. आता निर्जीव ईव्हीएमवरती आरोप केला जातोय. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन देखील म्हणाले की, हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर बोलता. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले…नाना पटोले वाचले…कोणी 1 लाखाने येतो तर कोणी दोनशे आठ मतांनी आले, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाना पटोले यांना टोला लगावला.

विरोधकांवर हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले, काही लोक म्हणतात आता काही दिशा आहे का लोकांनी तुमची दशा केल्यानंतर काय दिशा असणार. काही लोकांनी आता बहिष्कार टाकला आहे. ⁠लोकभावनेची त्यांना दिशा कळली असती तर अशी दशा झाली नसती. जबतक सुरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनदा पराभव काँग्रेसने केला. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळतं घर आहे

Eknath Shinde thanked Nana Patole for this

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात