विशेष प्रतिनिधी
मुंबई : accident in Kurla मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघात झाला आहे. येथे एका अनियंत्रित बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 26 जण जखमी झाले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका मदतकार्यात गुंतल्या आहेत. accident in Kurla
अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेत असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर जमलेल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमदार महेश कुडाळकर याबाबत बोलताना म्हणाले, मी स्वत: घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचे आहे. जवळपास 30 लोकांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आले आहे.
4 जणांचा मृत्यू, 26 जखमी
बेस्ट बसने अनेकांना चिरडले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून २६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App