विशेष प्रतिनिधी
नाशिक : आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीतील इंद्रायणी घाट विकास प्रकल्प युद्धपातळीवर सुरू असून, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे.
कापूर ओढा ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर घाट परिसरात भक्कम घाट, आकर्षक पाथ-वे, आधुनिक विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण, स्वच्छतागृहे, पार्किंगसह विविध विकासकामे होत आहेत. संतभूमीचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपत आधुनिक सुविधा निर्माण करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. प्रलंबित भूसंपादन आणि जोडरस्त्यांचे प्रश्न समन्वयातून मार्गी लावण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण राखत विकास करण्यावरही भर देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली वारकरी संप्रदायाची सेवा, संत परंपरेचा सन्मान आणि देहूच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आनंददायी वारीचा अनुभव मिळावा, हीच फडणवीस सरकारची भूमिका असल्याचे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App