विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने माओवादी हिंसाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आले.
– मोठ्या प्रमाणात साहित्य नष्ट
या कारवाईत सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग 12 – बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य हस्तगत करून नष्ट करण्यात आले. माओवाद्यांकडून नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील कालावधीत सुरक्षा दलांविरोधात घातपाताच्या कारवाया करण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्याचा वापर केला जात होता. या कारवाईमुळे मोठ्या हिंसाचाराचा संभाव्य धोका टळला असून माओवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती आणि घातपाताच्या कारस्थानाला मोठा धक्का बसला आहे.
या प्रभावी कारवाईमुळे माओवादाविरोधातील राज्याच्या झिरो टॉलरन्स धोरणाला आणखी बळ मिळाले असून गडचिरोलीत शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे वातावरण अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशस्वी कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सर्व शूर जवानांचे विशेष अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App