10 मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, घसाही बसला; प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!!

All Sharad Pawar's programs canceled today due to ill health!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामतीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढत असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, वयोमानपरत्वे झालेला अतिरिक्त प्रवास आणि महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याची ओढाताण यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आजचे सर्व कार्यक्रम प्रकृती अस्वस्थ्यामुळे रद्द केले आहेत. शरद पवारांची आजची पुण्यातली कात्रज मधली नियोजित सभाही होणार नाही. All Sharad Pawar’s programs canceled today due to ill health!!

शरद पवारांच्या पक्षाने महाविकास आघाडीतल्या आपल्या वाट्याला आलेल्या 10 लोकसभा जागांवर निवडणूक लढवली. या सगळ्यांमधली प्रचाराची धुरा शरद पवारांनी स्वबळावर सांभाळली. त्यांनी कन्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मध्ये देखील कधी नव्हे एवढा प्रवास करून दुष्काळी भागातही सभा घेतल्या. वयमानपरत्वे पवारांना प्रचाराचा हा ताण सहन झाला नाही. एरवी पवारांनी महाराष्ट्रात प्रचंड फिरून शेकडो सभा घेतल्या. परंतु आता पवारांचे वय बोलू लागल्याने त्यांचा बारामतीच्या अखेरीच्या सभेत घसा बसला तरी देखील त्यांनी सात मिनिटे भाषण केले. सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीकरांकडे आशीर्वाद मागितले.



पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम पवारांनी रद्द केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कळविले.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त होते. महाविकास आघाडीची मोट टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले .काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, तरी देखील प्रचारसभा घेणे त्यांनी थांबविले नाही. त्यांनी पुढेही अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत. या निवडणूक दौऱ्यांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ होऊन त्यांना आरामाची गरज आहे. म्हणूनच, त्यांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांचे उद्या 6 मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या दिनांक 6 मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

All Sharad Pawar’s programs canceled today due to ill health!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात