रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रुधारा, अश्रू सुकले सुप्रियांच्या डोळा, अजितदादांच्या भाषणातून बरसल्या नक्कलेच्या धारा!!


विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामतीतल्या नणंद विरुद्ध भावजय घरातली विरुद्ध बाहेरची अशा रंगलेल्या लढतीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अपेक्षा नुसार राजकीय नाटक रंगले. शरद पवारांच्या स्टेजवर रोहित पवार रडले, तर त्यांची नक्कल करून अजितदादांच्या भाषणातून रोहित पवारांवर टीकेच्या धारा बरसल्या. Rohit Pawar cried on Sharad Pawar’s stage

बारामतीतला प्रचार थंडावताना खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या राजकीय इतिहासात कधी नव्हे एवढे राजकीय नाटक बारामतीकरांना बघायला मिळाले. दोन्ही बाजूचे पवार मैदानात हिरीरेने उतरले होते.

वरिष्ठ तुम्हाला भावनिक करतील. माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला म्हणजे सुप्रियाला निवडून द्या, असे सांगतील. सहानुभूतीच्या लाटेत तुम्हाला वाहून येतील काहीतरी राजकीय नाटक घडवून आणतील, असे भाकीत अजितदादांनी आधीच वर्तविले होते. ते बारामतीच्या शरद पवारांच्या शेवटच्या सभेत खरे झाले, पण स्वतः पवारांचा आवाज बसल्याने ते फक्त 7 मिनिटे बोलले. पण त्याआधी रोहित पवारांनी भर स्टेजवर रडून घेतले. नवी पिढी घडवल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, असे साहेब आम्हाला म्हणाले होते. पण साहेब तुम्ही आम्हाला असे म्हणू नका, असे रोहित पवारांनी रडून शरद पवारांना स्टेजवरून आवाहन केले.

सुप्रिया सुळे यांनी तर गेल्या 10 महिन्यांत आपण किती वेळा रडलो, त्यामुळे आता डोळ्यातले अश्रू देखील सुकले. आता डोळ्यातून अश्रू येतच नाहीत आणि रडायचे तर कुणासाठी?? रडायचे ते तर निघून गेले. मी त्यांच्या इतकी खालच्या स्तरावर जाणार नाही, असे सांगून स्वतःच्या रडण्याचा किस्सा पवारांच्या शेवटच्या सभेत रंगवून सांगितला. त्यामुळे बारामतीतले पवारांचे इमोशनल नाट्य जोरदार रंगले. पण त्यामुळेच अजित पवारांना पवारांच्या सभेचे वाभाडे काढायची संधी त्यांच्याही शेवटच्या सभेत मिळाली.

अजितदादांनी रोहित पवारांची रडण्याची नक्कल केली. मी तुम्हाला सांगत होतो ते काहीतरी नाटकबाजी करतील. आमच्या पठ्ठ्यानं ती नौटंकी केलीच. मी पण तुम्हाला रडून दाखवतो असे म्हणून अजितदादांनी रडण्याचे नाटक केले. खिशातून रुमाल काढून डोळे पुसले. त्यावेळी अजितदादांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला.

पण जो बारामती हा शरद पवारांचा गेली

50 वर्षे बालेकिल्ला होता, ज्या बारामती शरद पवार फक्त शेवटची सभा घ्यायचे. त्या आधीची सर्व प्रचाराची धुरा अजित पवार आणि बाकीच्या कार्यकर्त्यांवर सोपवून संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचे, त्या शरद पवारांना बारामतीच्या बालेकिल्ल्यात पायाला भिंगरी लावून फिरावे लागले. कधीच गेले नसलेल्या दुष्काळी गावांमध्ये जावे लागून शाळेच्या विद्यार्थ्यांपुढे सभा घ्यावी लागली आणि शेवटी घसा बसला असताना सुद्धा मुलीसाठी मते मागताना त्यांचा कंठ दाटून आला.

बारामतीत गेल्या 50 वर्षांमध्ये कधीही घडले नव्हते, ते “कुटुंब रंगले निवडणुकीत” हे नाट्य रंगले आणि प्रचाराच्या अखेरीच्या सभांमधून काल त्याची अखेरची घंटा वाजली. आता 4 जुलै रोजी पडदा उघडेल, त्यावेळी स्टेजवर नेमके कोण असेल??, आणि बारामतीकरांनी विंगेत कोणाला पाठविले असेल??, हे पाहावे लागणार आहे.

Rohit Pawar cried on Sharad Pawar’s stage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात