पश्चिम महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतिष्ठेच्या माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय नियोजन पूर्वक “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग” केले. एरवी असे “क्लस्टर बॉम्बिंग” शरद पवार करत असत, पण यावेळी थकले भागलेले शरद पवार लेकीसाठी पूर्णपणे बारामती लोकसभा मतदारसंघात अडकले. त्या उलट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मात्र मतदारसंघ नियोजनपूर्वक वाटून घेऊन शेवटच्या दिवशी प्रचाराचे “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग” केले. Devendra fadnavis and ajit pawar did political cluster bombing in madha, solapur and baramati loksabha constituencies on the last day of campaign
यात सिंहाचा वाटा अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा होता. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर फलटण आणि सातारा येथे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मोठे मेळावे घेतले. महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. त्यात साताऱ्यात त्यांनी परवा दिवशीच उदयनराजे भोसले यांच्यासाठी पाटण + सातारा या दोन्ही ठिकाणी मोठ्या जाहीर सभा घेतल्या, काल ते साताऱ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. तेथे महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांनी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत मतदाराला घराबाहेर काढून मतदान करायला लावून मतदानाचा टक्का वाढविणे हा या भेटीचा प्रमुख हेतू होता. यासाठी फडणवीसांनी स्थानिक पातळीवरच्या सर्व छोट्या मोठ्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या फळीचे पूर्ण नियोजन लावून दिले. फडणवीसांनी पंढरपूर, सातारा आणि फलटण या तिन्ही ठिकाणच्या मेळाव्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याचाच कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला.
धैर्यशील मोहिते पाटलांनी आपण माळशिरसच्या जोरावर माढा लोकसभा मतदारसंघ जिंकू, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार फडणवीसांनी फलटणच्या सभेत घेतला. तुतारीवाल्याला माळशिरसच्या जोरावर माढा जिंकायचा असेल, फलटणकरांनी रणजीत सिंह निंबाळकर यांना 90 % मताधिक्य दिले पाहिजे, असे आवाहन फडणवीसांनी केले.
पंढरपूर मध्ये त्यांनी आमचे विठ्ठल परिवाराकडे लक्ष होतेच, विशेषत: अभिजीत पाटलांकडे पाटलांवर डोळा होताच, असे उघडपणे सांगून लोकसभा आणि विधानसभेची पंढरपूर मधली पुरती बेगमी करून टाकली. पंढरपूर विठ्ठल कारखान्याला त्यांनी साखरेसंदर्भात पूर्ण हमी दिली. त्यामुळे सभासदारांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद माढा मतदारसंघाबरोबरच बरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातलेही घटक आहेत. त्यामुळे पंढरपूर मध्ये नेमक्या ठिकाणी मेळावा घेऊन फडणवीसांनी रणजीत सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या तिथल्याही मताधिक्याची बेगमी करून टाकली.
रोहितचे रडूनाट्य अजितदादांची नक्कल
त्याचवेळी अजितदादांनी इंदापूर आणि भोर मध्ये मेळावे घेऊन समारोपाची सभा बारामतीत केली. शरद पवारांच्या सभेत रोहित पवार रडले आणि अजितदादांना आयता मुद्दा हातात मिळाला. सुनेत्रा पवारांसाठी घेतलेल्या अखेरच्या सभेत अजितदादांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल करून शरद पवारांच्या अखेरच्या सभेची पुरती खिल्ली उडवली. बारामतीचे हे “रडीचा डाव” नाटक संपूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले. रोहित पवार रडताहेत आणि अजितदादा त्यांची नक्कल करताहेत याचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातच काय पण देशातही व्हायरल झाले. त्यामुळे अजितदादांची अखेरची सभा सुपरहिट गेली.
शरद पवारांच्या शेवटच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी आपण गेले 10 महिने रडलो. त्यामुळे याचा डोळ्यातले पाणी सुकले आणि रडायचे तर कुणासाठी रडायचे??, ज्यांच्यासाठी रडायचं ते निघून गेले. आता त्यांच्यासाठी रडायचे नाही, तर आपण लढायचे अशी आव्हानाची भाषा वापरली, पण शरद पवारांचा मात्र बारामतीतल्या शेवटच्या सभेत घसा बसल्याने ते फक्त 7.00 मिनिटे बोलू शकले, पण तरी देखील त्यांनी प्रयत्नपूर्वक बोलून लेकीसाठी मते मागितली.
एरवी शरद पवार बारामतीत फक्त शेवटची सभा घेत असत, पण 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांच्या जीवनात असा काही “टर्निंग पॉईंट” घेऊन आली की, शरद पवारांना बारामतीत अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरावे लागले. ज्या दुष्काळी गावांचे त्यांनी कधी तोंडही पाहिले नव्हते, त्या गावांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांसमोर त्यांना भाषणे करावी लागली. या निमित्ताने सुपा + कारखेल सारख्या गावांना शरद पवारांचे पाय लागले. अख्खे पवार कुटुंब पवारांच्या पाठीशी उभे राहिले, पण अजितदादांनी मात्र महायुतीच्या बड्या नेत्यांच्या सहाय्याने स्वतःचा बालेकिल्ला लढवला. यात त्यांचे नियोजन पक्के होते.
सुप्रिया सुळेंनी दाखवलेल्या प्रत्येक कामामध्ये आपलाच कसा सिंहाचा वाटा होता ते अजितदादांनी पुराव्यानिशी दाखवून दिले सुप्रिया सुळे फक्त लोकसभेत चांगले भाषणे करू शकतात. बारामती लोकसभा मतदारसंघात काम आपल्यालाच करावे लागते आणि इथून पुढे करावे लागणार आहे, असे अजितदादांनी बारामतीकरांच्या मनावर पुरते ठसवून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App