जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या गटात?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ICC ने आज महिला T20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी बांगलादेश टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. ICC Announces Full Schedule of Womens T20 World Cup 2024
महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथे होणार आहे. सर्व संघ आपापल्या गटात ४-४ सामने खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अ गट- भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, क्वालिफायर १. ब गट- बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, क्वालिफायर २.
भारतीय महिला क्रिकेट संघ 4 ऑक्टोबर रोजी महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना ६ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर, भारतीय संघ ९ ऑक्टोबर रोजी क्वालिफायर 1 शी स्पर्धा करेल. टीम इंडिया १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more