नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे

75 theaters will be updated in the state to strengthen theater culture Chief Minister Shinde

महाबळेश्वरमध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विभागीय संमेलनाचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी

सातारा : महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विभागीय संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल, माजी संमेलन अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह राज्यभरातून आलेले अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. 75 theaters will be updated in the state to strengthen theater culture Chief Minister Shinde

महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच, नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्य संमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

75 theaters will be updated in the state to strengthen theater culture Chief Minister Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात