खलिस्तान्यांना दणका, ब्रिटनमध्ये संघटना, टीव्ही चॅनल्ससह नेत्यांवर बंदीची तयारी


वृत्तसंस्था

लंडन : भारताला मोठे राजनैतिक यश मिळणार आहे. ब्रिटनचे सुनक सरकार भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान समर्थक गटांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन (आयएसवायएफ), खालसा टेलिव्हिजन लिमिटेड, एक खलिस्तानी टेलिव्हिजन चॅनल आणि काही व्यक्तींवर बंदी घालण्याची शक्यता आहे.Big hit to Khalistan, Organizations in Britain, preparations for ban on TV channels and leaders

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने एक दस्तऐवज तयार केला आहे. गेल्या वर्षी भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला हेदेखील या गटांवर बंदी घालण्याच्या तयारीचे प्रमुख कारण आहे. या घटनेमुळे भारत व ब्रिटनमध्ये राजनैतिक संकट निर्माण झाले. कागदपत्रात भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यात खलिस्तानींचा सहभाग आहे.



हिंदूंवर हल्ले, तरुणांच्या ब्रेनवॉशमुळे कारवाई

इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन ही ब्रिटनमध्ये बंदी घातलेल्या यादीत आहे. हिंदू, मध्यम शीख आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हत्या, बॉम्बस्फोट आणि अपहरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र २०१६ मध्ये त्यावरील बंदी उठवण्यात आली.​​​​​​​

खालसा टेलिव्हिजन लिमिटेडवर फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यावर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचा परवाना अखेर रद्द केला. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.

कलदीपसिंग ऊर्फ दीपाला गेल्या वर्षी २५ डिसेंबरला दहशतवाद अधिनियमात लंडनमध्ये ताब्यात घेतले होते.

बब्बर खालसा इंटरनॅशनल ही संघटना हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यासाठी कुख्यात आहे. अमेरिकेत याप्रकरणी अटक झाली आहे.

Big hit to Khalistan, Organizations in Britain, preparations for ban on TV channels and leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात