विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीपिका पदुकोण, सिध्दार्थ चतुर्वेदी, अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गेहराइयाँ’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शकुण बत्रा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
The teaser of the movie ‘Gehraiyaan’ has been released, starring Deepika Padukone, Siddharth Chaturvedi and Ananya Pandey
मागील एक वर्षापासून दीपिका या प्रोजेक्टमध्ये बिझी होती. आणि आता फायनली तिच्या चाहत्यांना ह्या सिनेमाचा टिझर पाहायला मिळाला आहे. छपाक हा तिचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दीपिका आता गेहराइयाँ या सिनेमामध्ये दिसणार आहे.
दीपिका पदुकोण पीव्ही सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना दिसली, चाहत्यांनी सांगितले – बायोपिक होणार आहे
मॉडर्न रिलेशनशिप, लग्न या गोष्टींवर आधारित हा सिनेमा असणार आहे. असे चित्रपटाच्या टीझर वरुन लक्षात येते. या नातेसंबंधांना अतिशय खोलात जाऊन या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीझरवरून हा चित्रपट किती प्रॉमिसिंग असणार आहे याची एक झलक दिसतेय. सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण या दोघांची केमिस्ट्री तुफान दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App