अमित शाहांच्या वक्तव्यावर मनसेचा पलटवार; ‘महाराष्ट्राचा इतिहास विसरू नका’

MNS warns Amit Shah

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठी भाषेचा अपमान करू नये. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. हवे तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या इतिहासाचे पुस्तक अमित शाह यांना पाठवू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. MNS warns Amit Shah

एका कार्यक्रमात अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही लोक दुसरी भाषा शिकण्यास नकार देत असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यांवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करत महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य असल्याची आठवण करून दिली. महाराष्ट्र बहुभाषिक राज्य असल्याचे सांगून मराठी भाषिकांच्या भावनांचा अपमान करणारी वक्तव्ये करू नयेत, असे त्यांनी म्हटले.



“एका बाजूला गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आणि हिंदी येत नाही, असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन हिंदी शिकण्याचा सल्ला द्यायचा, हा दुटप्पीपणा आहे,” अशी टीका काळे यांनी केली.

ज्यांना हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे, ते नक्कीच हिंदी शिकतील. मात्र, हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवर आक्रमण करण्याचा किंवा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अशाच प्रकारची भाषा अमित शाह तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये करू शकतील का, असा सवालही काळे यांनी उपस्थित केला. हिंदी लादण्याच्या भूमिकेमुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला राजकीय फटका बसल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.

“महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे, याचा विसर पडू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या इतिहासाचे पुस्तक अमित शाह यांना पाठवू,” असे गजानन काळे यांनी म्हटले.

MNS warns Amit Shah, offers to send book on Samyukta Maharashtra movement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात