विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2015 मध्ये सलमान खान आणि करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या सिनेमामध्ये मुन्नीचे कॅरेक्टर प्ले करणारी हर्षाली देखील खुप प्रसिध्द झाली होती. एकही डायलॉग होता न बोलता, एका मुक्या मुलीचा रोल या पोरीने अतिशय चांगल्या पध्दतीने निभावला होता. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. या सिनेमातील गाण्यानेदेखील लोकांना अक्षरशः वेड लावले होते.
The sequel of Bajrangi Bhaijaan will be released soon, Salman Khan himself announced
एस एस राजामौली यांचा RRR हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात चालू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सलमान खानने हजेरी लावली होती. त्यावेळी सलमान खानने एक घोषणा केली आहे. बजरंगी भाईजान चा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे असे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. एस एस राजामौली यांचे वडील प्रसाद कुमार हे या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिणार आहेत, असे देखील त्यांने यावेळी जाहीर केले आहे.
‘अंतिम ‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान पोहचला गांधी आश्रमात
या चित्रपटामध्ये करिना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी असणार की नाही याबाबत मात्र अजून कोणतेही बातमी आलेली नाहीये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App